शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :  ५२ जिल्हा परिषद गटांसाठी २६ लाखांचा निधी वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:57 IST

५२ जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे २६ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. याकरीता ५२ जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे २६ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी २४ एप्रिल रोजी दिली.ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकामी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मीना आणि आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी बैठक घेऊन निधीसंदर्भात नियोजन केले. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातुन २६ लाखांची तरतुद करण्यात आली. प्रति गट ५० हजार याप्रमाणे ५२ गटांकरीता एकुण २६ लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला आला. जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूबाबत आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृती करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मागील आठवडयात आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर २४ एप्रिल रोजी उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी पुढाकार घेऊन पुढील काळात गावातील लोकांना अडचणीचा सामना करावा लागु नये यासाठी आर्थिक तरतुद करुन ठेवली आहे.सदरचा निधी हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणार असुन तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर उपलब्ध आहे. या निधीचा उपयोग कोविड-१९ चे पेशंट ने-आण करण्यासाठी, वाहन सुविधा उपलब्ध करणे व तातडीची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे . तसेच संबंधित गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचविलेल्या कामाकरीता हा निधी वापरण्यात येणार असल्याचे डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद