शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदानसंदर्भात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 18:34 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात चर्चा केली. शासनदरबारी हा प्रश्न मांडून अनुदानाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार पाटणी यांनी शेतकºयांना दिली.

ठळक मुद्देशेतक-यांनी घेतली आमदार पाटणी यांची भेट प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात चर्चा केली. शासनदरबारी हा प्रश्न मांडून अनुदानाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार पाटणी यांनी शेतकºयांना दिली.शेतक-यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाला चालना देण्यासाठी विविध शासकीय योजनेंतर्गत मूग, उडीद, तूर, हरभरा व सोयाबीन या पिकांच्या बियाणे उत्पादनास सहाय्य व बियाणे वितरण या बाबींसाठी गत काही वर्षांपासून शासनाकडून अनुदान दिले जाते. १७ मे २०१७ च्या आदेशानुसार शेतकरी उत्पादक गट, कंपन्या, मंडळे यांना बियाणे उत्पादन व वितरण या प्रणालीतून वगळले आहे. मात्र, सन २०१६-१७ या वर्षात बियाणे उत्पादन प्रक्रिया सुरू केलेल्या शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांना २०१७ च्या हंगामात बियाणे उत्पादन व वितरण या बाबींचे अनुदान मिळणे क्रमप्राप्त आहे, हा मुद्दा घेऊन जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. बियाणे उत्पादनाची प्रक्रिया ही एका वर्षाअगोदर सुरू होते. सन २०१६-१७ मध्ये बिजोत्पादन केलेले बियाणे सन २०१७-१८ मध्ये तयार झाले आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मध्ये तयार झालेले बियाण्यासाठीसुद्धा कृषी विभागामार्फत शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळावे, अशी मागणी उत्पादक गटाच्या शेतकºयांनी केली. लाखो रुपयांचे कर्ज काढून बियाणे उत्पादन प्रक्रियेत शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांनी पाऊल टाकले आहे. शासनाच्या हा निर्णय येण्यापूर्वीच सन २०१६-१७ मध्ये शेतकºयांनी बियाणे उत्पादन प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे किमान २०१६-१७ या वर्षामध्ये सुरू केलेल्या बियाणे उत्पादन प्रक्रियेंतर्गतच्या बियाणे उत्पादन व वितरण या बाबीला अनुदान देण्याची मागणी शेतकºयांनी केलेली आहे. यासंदर्भात १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याशी पंजाबराव अवचार, रवींद्र बोडखे, गजानन अवचार, शिवाजी भारती यांच्यासह अन्य शेतकºयांनी चर्चा केली. २०१६-१७ मध्ये खरिप व रब्बी हंगामातील बियाणे उत्पादन प्रक्रियेंतर्गतचे उत्पादन व वितरण अनुदान मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांनी आमदार पाटणी यांच्याकडे केली. हा मुद्दा शासनस्तरावर मांडून अनुदानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही राजेंद्र पाटणी यांनी शेतकºयांना दिली. 

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी