शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

वाशिमच्या ‘सदानंद’ची स्वच्छता जनजागृतीसाठी ‘वाशिम ते दिल्ली’ वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:18 IST

गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वाशिम : स्वत: हलाखीचे जीवन जगून दुसºयासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेले कमीच. परंतु वाशिम शहरातील सदानंद गजानन तायडे हा युवक त्यापासून अपवाद आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे  देणाºया या ध्येयवेडा या युवकाने चक्क आता गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे. यापूर्वीही स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर यात्रेदरम्यान तेथे जावून स्वच्छता करुन जनजागृती केली होती.वाशिम येथील रहिवासी सदानंद गजानन तायडे हा कॉलेज जिवनापासूनच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. स्वच्छतेबाबत आगळे-वेगळे उपक्रम राबवून त्याने राज्यात आपले नावलौकीक केले आहे. पंढरपूर यात्रेत गाडगेबाबांची वेशभूषा करीत संपूर्ण रस्ते झाडण्याच्या कार्यापासून तर अंधश्रध्दा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृतीसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा जणू विडाच उचलला. आता तर त्याने चक्क स्वच्छता जनजागृतीबाबत दिल्लीपर्यंत सायकलवारी सुरु केली. या रॅलीमध्ये सदानंद ज्या गावात मुक्काम करेल त्या गावाची संपूर्ण आधी स्वच्छता करेल व नंतर त्या गावात पोटासाठी अन्न व ग्रामपंचायत, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपले मुक्काम करुन पुढचा प्रवास करणार आहे. १० जानेवारीपासून मराठवाडयातील तसेच वाशिमपासून जवळच असलेले गोरेगाव येथील आपल्या शेतामधून सकाळी १० वाजता सुरुवात केली. तेथून सदानंदने आपले गाव वाशिमातून पुढचा प्रवास सुरु केला आहे. आपला देश स्वच्छ व सुंदर रहावा याकरिता आपण प्रयत्न करीत आहे. आधि गावपातळीवर नंतर शहर पातळीवर आपण मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान व त्याबाबत जनजागृती केली. आता थेट दिल्लीपर्यंत जावून रस्त्यात लागणाºया सर्व गावांना भेटी देवून जनजागृती करणार आहे. हे करताना मिळणारे आत्मिक समाधान औरच आहे. मी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना झोपडपट्टीत जावून शिक्षण दिले. आज मी दिलेले शिक्षण कितपत कामी आले याकरिता पुन्हा तेथे जावून पाहिले असता ती मुले खळखळ वाचून दाखवित आहेत. त्यापेक्षा त्यांच्या पालकांकडून माणण्यात येत असलेले आभार शब्दात सांगता येत नाहीत.- सदानंद तायडे, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान