शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

वाशिम : रक्कम काढण्यासाठी बँकेत पहाटेपासूनच ग्राहकांच्या ‘रांगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:20 IST

नागरिकांच्यावतिने जिल्ह्यातील सर्वच बँकांसमोर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोराना बाधित रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांची गर्दी होउ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तथापि, अनेक नागरिक अद्याप कोरोना विषाणू संसर्गाबद्दल गंभीर नसल्याने बँकांसमोरील गर्दी हटता हटेना अशी स्थिती वाशिम शहरासह ग्रामीण भागात कायम आहे. सद्यस्थितीत तर पहाटेपासूनच ग्राहक रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम, उज्ज्वला योजनेतील सिलिंडर आणि जनधनच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी महिला, शेतकरी आणि सर्वसाधारण नागरिकांच्यावतिने जिल्ह्यातील सर्वच बँकांसमोर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग हा एकापासून दुसºयाला होत असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये तसेच विशिष्ट अंतर ठेवून एकमेकांपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने वारंवार केले. परंतू, नागरिकांनी सदर आवाहन गांभीर्याने घेतले नसल्याचे बँकेसमोर गर्दीवरून दिसून येते. विशेष म्हणजे अनेक बँकासमोर गर्दी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतांना दिसून येत नाहीच. पहाटे ६ वाजतापासून शहरातील बँकेमध्ये रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. लवकर आल्यानंतर पाहिला क्रमांक आपला लागावा या उद्देशाने ग्राहक पहाटे हजर राहणत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत बँकेची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता आहे. याकरिता ग्राहक मात्र सकाळी ६ वाजापासून रांगा लावताना दिसून येत आहे. १८ एप्रिलपासून बँकेची वेळ ८ ते दुपारी दोन करण्यात आली आहे.

गर्दी न करण्याच्या आवाहनाला ‘खो’!कोरोना विषाणुला हद्दपार करायचे असेल तर यावर केवळ एकमेव रामबाण उपाय म्हणजे गर्दी करु नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये हा आहे. असे असले तरी नागरिका रस्तयावर अत्यावश्यक कामे नसताना सुध्०ा फिरतांना दिसून येत आहे. ात्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतिने गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु या आवाहनाला नागरिकांनी केराची टोपली दाखविली असे म्हटल्या वावगे ठरु नये. शहरातील गर्दी कमी करायची असल्याने प्रशाासनाच्यावतिने विशेष पास उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आवाहनानुसार कार्य करण्याचे कळविण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतिने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले व आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवा. कुठेही विनाकारण गर्दी करु नये, तोंडाला मास्क वापरावा. गर्दी होणार नाही याकरिता भाजीबाजार, मेडिकल व बँकेसमोर पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. त्यांना सहकार्य करा. गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- वसंत परदेसीपोलीस अधीक्षक , वाश्मिा

टॅग्स :washimवाशिमbankबँक