शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:54 IST

वाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देयुद्धपातळीवर पंचनामे येत्या आठवड्यात अहवाल तयार होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.जिल्हय़ात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ८५0९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. रविवारनंतर सोमवारी कारंजा तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर १३ फेब्रुवारीला कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. मानोरा तालुक्यातील रूईगोस्ता परिसरात झालेल्या गारपिटीने फळबागा व गहू, हरभरा  आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील गोवर्धन, पार्डी तिखे, आसेगाव, येवती, रिठद, चिंचाबापेन, दापुरा, किनखेडा, पळसखेडा, वाडी रायताळ, मसलापेन आदी परिसराला गारपिटीने झोडपून काढल्याने शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी, कृषी सहायक,  ग्रामसेवक यांच्या चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून, येत्या आठवड्यात अंतिम अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे.मालेगाव तालुक्यातील मुंगळा, शिरपूर, राजुरा परिसरातील गहू, हरभरा यासह संत्रा व फळबागेचे अतोनात नुकसान झाले असून, पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, याचा प्राथमिक अंदाज येत्या दोन दिवसात सांगता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वाशिम तालुक्यातील अनसिंग, वारा जहागीर, देपूळ, उमरा शमशोद्दीन, बोरी, धानोरा मापारी, दगडउमरा यासह अन्य ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने १६00 ते १८00 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातही पंचनामे केले जात आहे. रविवारी झालेल्या गारपिटीपेक्षा मंगळवारच्या गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत प्राथमिक अंदाज समोर येईल तसेच येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 

टॅग्स :washimवाशिम