शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आईला मारहाण करून पप्पांनी तिला झोक्याला बांधले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 04:52 IST

‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असा जबाब अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याने दिल्याने तिच्या आईने आत्महत्या केली नसून वडिलांनीच हत्या केल्याचा गुन्हा नोंदवून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शिरपूर जैन (वाशिम) - ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असा जबाब अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याने दिल्याने तिच्या आईने आत्महत्या केली नसून वडिलांनीच हत्या केल्याचा गुन्हा नोंदवून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.२४ मे २०१८ रोजी घडलेल्या या घटनेची अधिक माहिती अशी, की शिरपूर येथील जगन्नाथ काठोळे यांची मुलगी सुनिता हिचा विवाह ५ वर्षांपूर्वी भापुर (ता.रिसोड) येथील धनंजय बोडखे याच्याशी झाला होता. दरम्यानच्या काळात या दाम्पत्यास तीन गोंडस मुली झाल्या. मात्र, ‘तुझ्या पोटी मुलीच का जन्माला येतात’, असा प्रश्न वारंवार करून सुनिताचा पती धनंजय हा तिला नेहमीच मारहाण करून त्रास द्यायचा. त्यामुळे सुनिताच्या वडिलांनी तिला कुटुंबासह शिरपूरमध्ये वास्तव्यास आणले. ते राहत असलेल्या भाड्याच्या घरातच सुनिताचा मृतदेह झोक्याला गळफास लागलेल्या स्थितीत आढळून आला. दरम्यान, ही आत्महत्या नसून धनंजयनेच माझ्या मुलीची हत्या केल्याची तक्रार सुनिताचे वडील जगन्नाथ काठोळे यांनी पोलिसांत दिली. त्यामुळे पोलिसांनी चिमुकल्या श्रद्धाचा जबाब घेतला. आता धनंजयविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.आज आई या जगात नाही. तिला मारणारा बापही कारागृहात जाईल. त्यामुळे श्रद्धासह अडीच वर्षे वयाची सलोनी आणि सहा महिने वयाची आराध्या अशा तीघी बहिणी माय-बापाच्या प्रेमाला मुकणार आहेत.‘तुझ्या पोटी मुलीच का जन्माला येतात’, असा प्रश्न वारंवार करून सुनिताचा पती धनंजय हा तिला नेहमीच मारहाण करून त्रास द्यायचा. त्यामुळे सुनिताच्या वडिलांनी तिला कुटुंबासह शिरपूरमध्ये वास्तव्यास आणले. ते राहत असलेल्याघरातच सुनिताचा मृतदेह आढळून आला.

टॅग्स :Crimeगुन्हाwashimवाशिम