शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : शेलुबाजार-शेंदुरजना रस्ता पुन्हा निविदा काढून पूर्ण करा - पंचायत राज समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 17:44 IST

शेलूबाजार (वाशिम) : पंचायत राज समितीच्या चमुने १८ जानेवारीला मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदूरजना मोरे रस्त्याची पाहणी केली असता संबंधित अधिकाºयांना या रस्त्याची पुन्हा निविदा काढून रस्ता योग्य असा करुन द्यावा तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव  सादर करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी श्ोंदूरजना ग्रामवासीयांनी रस्त्याबाबतच्या तोंडी तक्रारी केल्या. 

ठळक मुद्देसंबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : पंचायत राज समितीच्या चमुने १८ जानेवारीला मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदूरजना मोरे रस्त्याची पाहणी केली असता संबंधित अधिका-यांना या रस्त्याची पुन्हा निविदा काढून रस्ता योग्य असा करुन द्यावा तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव  सादर करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी शेंदुरजना ग्रामवासीयांनी रस्त्याबाबतच्या तोंडी तक्रारी केल्या. पंचायत राज समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर, आमदार राहूल बोंद्रे, आमदार चरण वाघमारे, यांच्यासह अन्य सदस्य व संबंधित अधिकाºयांनी सर्वप्रथम शेलूबाजार ग्रामपंचायतच्या कार्यालयाला विनंतीवरून भेट दिली असता ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्याकडून विविध योजनाच्या खर्चाबाबत माहिती घेतली. त्यानंतर सदर चमूने शेंदूरजना ग्राम पंचायत सरपंच अविनाश अशोक धामंदे यांनी सदर रस्ता कामाची चौकशी व्हावी यासाठी जि.प.समोर उपोषण सुरु केले होते. त्या तक्रारीची दखल घेत रस्ता डांबरीकरण केल्यावर अवघ्या १५ दिवसात खड्डामय झालेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी सदर कामाच्या पुन्हा निविदा काढा, अंतिम देयक  कंत्राटदाराला न देता काम पूर्ण करून संबंधित कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवा अशा सुचना मंगरुळपीर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिनेश मालपानी यांना दिल्या. पीआरसीच्या चमूने दिलेल्या आदेशाचे पालन संबंधित अधिकारी करतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिम