शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहर वाहतूक शाखा नावापुरती; चक्क रस्त्यावर उभी राहतात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी याकरिता अनेक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली, परंतु याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी याकरिता अनेक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली, परंतु याचा काहीच फायदा होत नसून वाशिम शहर वाहतूक शाखा नावापुरतीच दिसून येत आहे. फेरीवाले, लघुव्यावसायिक चक्क रस्त्यावर दुकान थाटून बिनधास्तपणे बसत असतांना सुध्दा कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी त्यांना हटकतांना दिसून येत नसल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे. याकडे पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहरवासियांची वाढती मागणी व संबधितांवर निर्माण झालेला दबावामुळे पार्कींग व्यवस्था करण्यात आली. वाहनधारकांना होत असलेल्या दंडामुळे वाहने लाईनदोरीत आलीत परंतु फेरीवाले रस्त्यावर आल्याने वाहने चालवितांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहरात वाहतूक शाखा कार्यरत असतांना रस्त्यावर अडथळा निर्माण करणाºया वाहनांवर कारवाई करण्याची त्यांची जबाबदारी असतांना सुध्दा त्याकडे कुणीही फिरकून पाहतांना दिसून येत नाही. जेथे वाहतूक सुरळीत सुरु आहे तेथे मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठया प्रमाणात दिसून येतात.  रस्त्यावरुन जाणाºया वाहनांना अडवून त्यांना कागदपत्राची मागणी केल्या जाते. कागदपत्रे नसल्यास त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो. यापैकी किती दंड येतो व किता दाखविला जातो हा जरी चिंतनाचा विषय असला तरी रहदारीच्या ठिकाणी नागरिकांना होणाºया त्राासाचे या शाखेला काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारीही काहीच बोलत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. पोलीस अधिक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष देवून शहरातील रस्त्यावर उभे राहणाºया लघुव्यावसायिकांचा बंदोबस्त करुन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस