शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात सात दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 16:15 IST

CoronaVirus News वाशिम शहरात या सात दिवसात नव्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, वाशिम शहरात या सात दिवसात नव्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. ही बाब शहरवासियांसाठी तुर्तास तरी दिलासादायक ठरत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी यापुढेही सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात कोरोनाचा उद्रेक झाला.वाशिम शहरात जवळपास १८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरवासियांची चिंता वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सप्टेंबर महिन्यात व्यापाऱ्यांनी सात दिवस जनता कर्फ्यूही पाळला होता. दरम्यान आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरला. नोव्हेंबर महिना तुर्तास तरी शहरवासियांसाठी दिलासादायक ठरत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या सात दिवसात शहरात नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने शहरवासियांची चिंता बºयाच अंशी कमी होत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी दिवाळी सण लक्षात घेता घराबाहेर पडताना नेहमी मास्क किंवा रुमालचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे, नियमित व्यायाम करावा, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले.दरम्यान,आगामी दिवाळी सण लक्षात घेता वाशिम येथील बाजारपेठ गजबजली आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता गृहित धरता नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांची दुकानदारांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीदेखील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम