शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : बस पंक्चर, दीड तास खोळंब्याचा प्रवाशांना फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 19:11 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या मंगरुळपीर आगाराची अनसिंग-मंगरुळपीर ही बस  पंक्चर झाल्यानंतर दुसरी बस येण्यास दीड तासाच्या जवळपास वेळ लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिवणी दलेलपूरनजिक रविवारी दुपारच्या सुमारास घडला. 

ठळक मुद्देभंगार गाड्या परिवहन महामंडळाच्या उदासीनतेचा प्रत्यय 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या मंगरुळपीर आगाराची अनसिंग-मंगरुळपीर ही बस  पंक्चर झाल्यानंतर दुसरी बस येण्यास दीड तासाच्या जवळपास वेळ लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिवणी दलेलपूरनजिक रविवारी दुपारच्या सुमारास घडला. राज्य परिवहन महामंडळाच अनेक बसगाड्या भंगार झाल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना वारंवार सहन करावा लागत आहे. असाच प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील अनसिंग-मंगरुळपीर ा बसफेरीबाबतही रविवारी घडला. अनसिंग-मंगरुळपीर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या दिवसभर धावत असतात. यापैकी मंगरुळपीर आगाराची एमएच-४० ८६०४ क्रमांकाची बस शिवणी दलेलपूरनजिक पंक्चर झाली. त्यामुळे वाहकाने आगार प्रशासनाला माहिती देऊन दुसरी बस बोलावली; परंतु ही बस येण्यास दीड तासाच्या जवळपास विलंब लागला. त्यामुळे आवश्यक कामांसाठी प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसला. या बसमध्ये प्रामुख्याने महिला, बालके आणि वृद्ध प्रवाशांचा समावेश असल्याचे दिसले. पविहन महामंडळाच्या बसगाड्यांची दशा वाईट असल्याने बहुतांश बसगाड्या रस्त्यातच बंद पडतात आणि त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो. तथापि, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खडीमुळे ही बस पंक्चर झाल्याचे वाहक आणि चालकाकडून सांगण्यात आले. एकिकडे परिवहन महामंडळ सतत प्रवासभाड्यात वाढ करून कोट्यवधीचे उत्पन्न घेत असताना प्रवाशांसाठी मात्र सुसज्ज अशा बसगाड्या उपलब्ध केल्या जात नाहित. परिवहन महामंडळाने प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन चांगल्या बसगाड्या उपलब्ध कराव्यात, अशी मागणी या बसमधील प्रवाशांनी यावेळी केली.  

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ