शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
3
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
4
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
5
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
6
IRCTC Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
7
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
8
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
9
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
10
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
11
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
12
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
13
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
14
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
15
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
16
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
17
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
18
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
19
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
20
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य

vidhan sabha 2019 : वाशिम विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 13:52 IST

विविध समस्या कायम असल्याने वाशिम विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात असल्याचे दिसून येते.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था, उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची टंचाई, उड्डाणपूलाचे रखडलेले काम यासह विविध समस्या कायम असल्याने वाशिम विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात असल्याचे दिसून येते.वाशिम विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाचे लखन मलिक करीत आहेत. या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यात आली नाही. एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढली तर उन्हाळ्यात वाशिम शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही. परंतू, या प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. वाशिम तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्नही निकाली निघाला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील समस्या निकाली काढण्यात आमदारांना फारशे यश आले नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत आहेत.

तालुका क्रीडांगण रखडले!महाराष्ट्र राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडांगण उभारण्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला. वाशिम तालुका आणि मंगरूळपीर तालुक्यात क्रीडांगणे उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तीन कोटींचा निधी वाशिमला मिळू शकला नाही.एकबुर्जीची भिंत रखडली!वाशिमकरांचे पाणी एकबुर्जी प्रकल्पातून दरवर्षी वाहून जाते. एकबुर्जी प्रकल्पाची भिंत उंच करण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे; मात्र आमदारांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. निधी आणण्यापासून तर भिंत उंच करण्यापर्यंतच्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांचा आहे.अडीच वर्षांपासून पुसद मार्गावरील उड्डाणपूल ‘जैसे थे’वाशिमच्या विकासात भर पडणाºया पुसद मार्गावरील उड्डाणपूल आहे; मात्र गत अडीच वर्षांपासून उड्डाणपुलाचे बांधकाम रेल्वे हद्दीमुळे थांबले आहे. रेल्वे हद्दीतील बांधकाम झाल्याशिवाय उड्डाणपूल पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे वाशिमकरांना आणखी किमान दोन वर्षे उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.दोन वर्षांत उखडले रस्तेवाशिम शहरातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात झाले; मात्र दर्जा टिकविला न गेल्याने आणि क्युरिंग न झाल्याने दोन वर्षांच्या आत सर्व रस्ते उखडले आहेत. त्यामुळे वाशिमकरांच्या नशिबी पुन्हा खड्डे आले आहेत.

 

वाशिम विधानसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच वंचित पक्ष त्यांचा उमेदवार घोषित करणार आहे. वंचितची लढाई थेट भाजपशी आहे, येथे काँग्रेस स्पर्धेतच नाही.-डॉ. नरेंद्र इंगळे,वंचित आघाडी, वाशिम.

वाशिमचे भाजपचे आमदार मलिक यांनी कोणता विकास केला, याची माहिती जनतेसमोर ठेवावी, त्या तुलनेत काँग्रेस कार्यकाळात अनेक योजनांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे यंदा मतदारसंघात काँग्रेससाठी चांगली स्थिती आहे.-दिलीप सरनाईक, काँग्रेस, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमwashim-acवाशिमCongress District President Dilip Sarnaikकाँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक