शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:14 IST

वाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविकासकामे सुरु करण्याची मागणीअधिका-यांना देणार निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आहे. रिसोड तालुक्यात असलेले मौजे बोरखेडी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत गावकर्‍यांची जमीन सन २००५-०६ मध्ये संपादित करण्यात आली, तसेच गावठाणाचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन गावठाणाची निर्मिती करण्यात आली. या गावठाण गावाच्या विकासासाठी बाधित झालेल्या धरणग्रस्तांनी अनेक वेळा संबंधीतांना निवेदने तसेच उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र याची दखल प्रशासनाने अद्यापही घेतली नाही. त्यानंतर १९ सप्टेबर २०११ रोजी धरणग्रस्तांनी कौलखेड येथे उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेवून प्रशासनाने सदर गावाचा अहवाल तयार करुन अधिक्षक अभियंता, वाशीम पाटबंधारे मंडळ यांना पाठविला. या अहवालानुसार, पुनर्वसीत गाव कौलखेड येथील शाळेचे व पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दजार्चे झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच गावाकडे जाणार्‍या रस्त्याचेही काम निकृष्ट झाला असून या रस्त्यावर जातांना एक ते दोन फुट पाय फसत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या गावातुन शाळेसाठी जाणार्‍या विद्यार्र्थ्यांना २किलोमिटर ऐवजी ९ किलोमीटर फेºयाने शाळेत जावे लागते. निकृष्ट रस्त्यामुळे शेतकरी शेतीत सुध्दा जावू शकत नाहीत. याबाबत २९ सप्टेंबर २०११ ला अधिक्षक यांनी दिलेल्या लेखी पत्रावर नमुद केले आहे की, गावठाणाचे पुनवर्सन करतांना प्रकल्पबाधीत शेतकर्‍यांना शासनाने कुठल्याच सुविधा पुरविल्या नाहीत. या समस्यांचे निवारण ३१ मे २०१२ पर्यत पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाने उपोषणकर्त्यांना दिले होते. तरी प्रकल्पातुन पुनर्वसीत झालेले गावठाणा मौजे कौलखेड येथे पाणीपुवठा, शाळा इमारत, समाजमंदिर, रस्ते, स्मशानभूमी, बाधित व्यक्तीच्या शेतीकडे जाणारे मार्ग, सार्वजनिक शौचालय व उघडी गटारे आदी विकास कामे येत्या १६ जानेवारी २०१८ पर्यत तात्काळ सुरु करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली असून कामे सुरु न झाल्यास येत्या बुधवार, १७ जानेवारी २०१८ रोजी कौलखेड वढव ग्रामपंचायत पदाधिकारी व धरणग्रस्तांच्या वतीने लघु पाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन