शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : प्रतिकुल हवामानाचा हळद उत्पादनावर परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:23 IST

वाशिम : इतर पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीच्या हळद पिकाला पाण्याची देखील जास्त गरज भासते. यंदा मात्र प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हळद उत्पादनावर थेट परिणाम झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा या तालुक्यांमध्ये हळद उत्पादकांची संख्या अधिक आहे. वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवड्यातील दर गुरूवारी हळद खरेदीची व्यवस्था उभी केली आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन आठवड्यात केवळ १६ क्विंटल हळद खरेदीसाठी आल्याची माहिती आहे.

वाशिम : इतर पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीच्या हळद पिकाला पाण्याची देखील जास्त गरज भासते. यंदा मात्र प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हळद उत्पादनावर थेट परिणाम झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन आठवड्यात केवळ १६ क्विंटल हळद खरेदीसाठी आल्याची माहिती बाजार समिती संचालक राजू चौधरी यांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात सोयाबीन, तूर, गहू व हरभरा या पिकांसोबतच हळदीचे देखील विक्री उत्पादन घेतले जाते. मुख्यत: वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा या तालुक्यांमध्ये हळद उत्पादकांची संख्या अधिक आहे. यामाध्यमातून दरवर्षी हळदीचे हजारो क्विंटल उत्पन्न घेतले जात आहे. काही शेतकºयांनी एकत्र येऊन शेतातून निघणाºया कच्च्या हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी ठराविक यंत्रणाही खरेदी केली आहे. याशिवाय हळद विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवड्यातील दर गुरूवारी हळद खरेदीची व्यवस्था उभी केली आहे. मात्र, गतवर्षी घटलेले पर्जन्यमान, यंदा अल्पावधीतच कोरडे पडलेले सिंचन प्रकल्प आणि प्रतिकुल हवामानामुळे जिल्ह्यातील हळदीच्या सरासरी उत्पादनात घट आल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच गत दोन आठवड्यापासून बाजार समितीत खरेदीसाठी येणाºया हळदीचे प्रमाणही घटल्याची माहिती राजू चौधरी यांनी दिली.हिंगोली, परभणीतूनही आवक घटली!वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत हळदीला ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. मात्र, विक्रीसाठी येणाºया हळदीचे प्रमाण घटले असून नजिकच्या हिंगोली आणि परभणी परिसरातून पुर्वी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी यायची; परंतु उत्पादनच घटल्याने गेल्या दोन आठवड्यापासून परिणाम झाल्याचे राजू चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम