शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई - मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा  इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 13:47 IST

वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला.

ठळक मुद्दे गावोगावी गृहभेटी अभियान

 

वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला.

जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे १५ नोव्हेंबरपर्यंत विशेष कुटुंब संपर्क अभियान राबविले होते. आता पुन्हा कुटुंब संपर्क अभियान हाती घेऊन गावोगावी जनजागृतीला सुरूवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामुहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा उपक्रमाचा उद्देश आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्या चमूने रिसोड तालुक्यातील केशवनगर व अन्य गावांना भेटी देऊन गावकºयांशी संवाद साधला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांनी मानोरा तालुक्यातील गावांना भेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी मंगरूळपीर तालुक्यातील गावांना भेटी देऊन जनजागृती केली. उघड्यावरील शौचास जाण्याचे दुष्परिणाम निदर्शनात आणून दिले. गावकºयांच्या अडचणी जाणून घेतल्या. गाव स्वच्छ व सुंदर तसेच हगणदरीमुक्त बनविण्यासाठी गावकºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद