शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:33 IST

वाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले.

ठळक मुद्देग्रामपंचायत पोटनिवडणूक : जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले.आरक्षित जागांवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशपत्रासोबतच सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र नसल्यास ते प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित समितीकडे अर्ज सादर केल्याची पोचपावती व विहित नमुन्यातील हमीपत्र जोडले असल्यास, असे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. सुरुवातीला जात वैधता प्रमाणपत्रच स्वीकारले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे इच्छुकांची गैरसोय झाली होती.  ५ फेब्रुवारी २0१८ पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, १0 फेब्रुवारी २0१८ पर्यंत सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ४.३0 वाजताच्या दरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. आता पोचपावती स्वीकारली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी १२ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू होईल.  २५ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजतापर्यंत मतदान व  २६ फेब्रुवारी २0१८ रोजी मतमोजणी होईल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकwashimवाशिम