शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ४५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:29 IST

सुमारे ४५ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण होऊन तसे प्रमाणपत्रही शेतकºयांना देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांकासह जिल्ह्यातील ८३ हजार ६३४ शेतकऱ्यांची दुसरी यादी २९ फेब्रुवारी रोजी संबंधित गावांमध्ये प्रसिद्ध झाली. गत चार दिवसांत सुमारे ४५ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण होऊन तसे प्रमाणपत्रही शेतकºयांना देण्यात आले.शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण केले जात आहे. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकºयांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी ३ मार्च रोजी केले. कर्जरक्कम जूळत नसल्यास ‘अमान्य’ पर्याय उपलब्धसंगणकाच्या स्क्रीनवर दिसणाº्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकºयांनी ‘अमान्य’ पर्यायाची निवड करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात संबंधित शेतकºयांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविली जाणार आहे. त्यावर जिल्हास्तरीय समिती योग्य निर्णय घेणार आहे.

प्रत देणे बंधनकारकशेतकºयाने मान्य अथवा अमान्य यापैकी कोणताही पर्याय निवडून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाºया शेतकºयांना संबंधित आपले सरकार सेवा केंद्र, बँकेने अथवा सहकारी सेवा सोसायटीने लगेचच पूर्ण झाल्याच्या प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र अथवा तक्रारीची प्रत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्रावर बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक व कर्ज रक्कम नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी संबंधित आपले सरकार सेवा केंद्र अथवा बँकेत आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्राची प्रत प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्ड