शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :  २३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:41 IST

८६ परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांचा वॉच : प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक ...

ठळक मुद्देएकूण २३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार. शिक्षण विभागाकडून एकूण १२ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत.आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या.

८६ परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांचा वॉच : प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणारलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या वार्षिक परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. एकूण २३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार असून, गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. दहावीची वार्षिक परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख तसेच मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवरील कॉपी प्रकरणे लक्षात घेता जिल्हा प्रशासन तसेच शिक्षण विभागाकडून एकूण १२ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. जिल्ह्यात दहावीच्या वार्षिक परीक्षेला एकूण २३ हजार २७१ विद्यार्थी बसणार असून, यामध्ये नियमित २०९२२ तर रिपिटर २३४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. 

 प्रतिबंधात्मक आदेशगैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी इयत्ता दहावी परीक्षा होणाºया सर्व परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहेत. परीक्षा केंद्रांवर ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी वगळता इतर इसमांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.  

दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. एकूण ८६ परीक्षा केंद्र असून, १२ भरारी पथके राहणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनीदेखील परीक्षा केंद्र संचालकांना सहकार्य करावे. विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार, कॉपी आढळून आल्यास संबंधित परीक्षार्थीविरूद्ध कारवाई केली जाईल. - तानाजी नरळेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा