शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मालेगावातील कोरोनाबाधिताचा मृत्यू ; पाच जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:17 IST

सदर व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील सहा जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्यांपैकी पाच अहवाल १९ मे रोजी पॉझिटिव्ह आले होते. यापैकी एका ६५ वर्षीय रुग्णाचा २६ मे रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मृत्यू झाला असून, उर्वरीत पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना २७ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाला होता. मेडशी येथील एक रुग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून यापूर्वीच सुटी देण्यात आली. दरम्यान, मुंबई येथून परतत असताना, १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.  या महिलेच्या संपर्कातील सहा जणांपैकी पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे १९ मे रोजी अहवालावरून स्पष्ट झाले होते. या सहा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. दरम्यान, ६५ वर्षीय एका रुग्णाला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता. सदर रुग्णाला गेल्या चार दिवसांपासून कृत्रिमरित्या आॅक्सिजन देवून डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, २६ मे रोजी त्याची प्रकृती बिघडली, दुर्दैवाने २६ मेच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.  दरम्यान, अन्य पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना २७ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली.दरम्यान, आतापर्यंत एकूण १८४ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १५५ अहवाल निगेटिव्ह आले. २१ अहवाल प्रलंबित आहेत. २७ मे रोजी एकूण १८ अहवाल निगेटिव्ह आले. आठ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोन मृत्यू तर उर्वरीत सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ‘रेड झोन’मधून येणाºया मजूर, कामगारांवर विशेष लक्ष ठेवले जात असून, सर्दी, खोकला किंवा ताप आदी लक्षणे असणाºयांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.  चिखली येथील तीन अहवाल प्रतिक्षेतसांगवी (ता. जिंतूर, जि.परभणी) येथील कोरोनाबाधित मृत महिलेच्या अंत्यसंस्काराला चिखली (ता.रिसोड) येथील तीनजण गेले होते. त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ २६ मे रोजी पाठविले. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या