शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ३.६९ लाख लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:13 IST

आतापर्यंत  ४.५९  लाखांपैकी ९० हजार लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले आहे. सिल्वर कार्ड १०२०७१ लाभार्थींना सिल्वर कार्डचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९० हजार लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ वाटप केले असून, उर्वरीत तीन लाख ६९ हजार लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे. पात्र लाभार्थींना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देण्यासाठी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंमलात आली आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबातील ४ लाख ५९ हजार ६४१ लाभार्थी हे गोल्डन कार्डसाठी पात्र ठरले आहेत. सदर कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह वाशिम येथील चार खासगी हॉस्पिटल येथील आरोग्य मित्रांकडे नोंदणी करावी लागत आहे. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्राम पंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर येथून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारणी तर अंगीकृत रुग्णालयामध्ये याकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आतापर्यंत  ४.५९  लाखांपैकी ९० हजार लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले आहे. सिल्वर कार्ड १०२०७१ लाभार्थींना सिल्वर कार्डचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमayushman bharatआयुष्मान भारत