शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:41 IST

जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, २१ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. या निर्णयामुळे शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील सुमारे २ लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या ९० हजार शेतकºयांसह कर्ज पुनर्गठण झालेले तथा जुन्या कर्जमाफी योजनेतील लाभ न मिळालेल्या सुमारे १ लाख ६० हजार शेतकºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे. त्यानुसार, कर्जमाफीचा हा आकडा सुमारे ५०० कोटीपर्यंत जाईल, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.आॅक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यासह गत काही महिन्यांमध्ये सातत्याने उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला आहे. या पृष्ठभुमिवर महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरूवात ही मार्च २०२० या महिन्यापासून होणार आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच कर्जाचे हप्ते नियमित भरणाºया शेतकºयांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.दरम्यान, आज जाहीर झालेल्या निर्णयास अनुसरून शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील २०१४-१५ पासून थकबाकीदार असलेल्या ९० हजार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळण्यासोबतच कर्ज पुनर्गठण आणि यापूर्वी शासनस्तरावरून जाहीर झालेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेले; परंतु अद्यापपर्यंत कर्ज माफ न झालेल्या शेतकºयांनाही लाभ दिला जाणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

विधानसभेत शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाच्या निकषानुसार ८० ते ९० हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासह कर्ज पुनर्गठण आणि जुन्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकºयांनाही पीक कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, सह. संस्था

 

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्ज