शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Washim: अमृत योजनेतून २० कोटी मंजूर; रेल्वेस्थानक होणार ‘हायटेक’, रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा झेंडा

By सुनील काकडे | Updated: August 4, 2023 18:48 IST

Washim: रेल्वे मंत्रालयाने देशभरातील स्थानकांच्या विकासाकरिता अमृत भारत स्थानक योजना अंमलात आणली. याअंतर्गत वाशिम रेल्वेस्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

- सुनील काकडेवाशिम : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील स्थानकांच्या विकासाकरिता अमृत भारत स्थानक योजना अंमलात आणली. याअंतर्गत वाशिम रेल्वेस्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून वाशिमचे रेल्वेस्थानक ‘हायटेक’ होणार असल्याची आशा पल्लवित झाली आहे. या उपलब्धीसाठी खासदार भावना गवळी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला, हे विशेष.

कधीकाळी नॅरोगेज असलेला वाशिमचा रेल्वेमार्ग मध्यंतरीच्या काळात ‘ब्राॅडगेज’मध्ये रुपांतरीत झाला. तेव्हापासून वाशिममार्गे उत्तर ते दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वेगाड्या उपलब्ध झाल्या. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली; मात्र या ठिकाणी प्रवाशांना अपेक्षित सुविधा उपलब्ध झालेल्या नव्हत्या. यासंदर्भात खासदार गवळी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्याचे अपेक्षित फलित होत रेल्वे मंत्रालयाने वाशिम रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी अमृत भारत स्थानक योजनेतून २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ६ ऑगस्ट रोजी आभासी पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा रितसर शुभारंभ झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती वाशिम रेल्वेस्थानकाच्या मुख्य वाणिज्य निरीक्षक कमलनयन मृणाल यांनी दिली.

२० कोटीच्या निधीतून ही कामे होणारमंजूर झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून रेल्वे स्थानक इमारतीचे नुतनीकरण, परिसर सुशोभीकरण, विद्युतीकरण, प्रशस्त वेटींग हॉल, पार्किंग व्यवस्था, स्वयंचलित जिन्याची उभारणी करुन स्थानकाच्या रचनेत सुधारणा, स्थानकात प्रशस्त बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, तिकिट खिडकीचे विस्तारीकरण आदी कामे केली जाणार आहेत.

अमृत भारत स्थानक योजनेतून रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. उपलब्ध निधीतून स्थानकाचा चेहरामोहरा बदलून हे स्थानक ‘हायटेक’ बनणार आहे़  शासनाच्या निर्देशानुसार वेळोवळी कामात सुधारणा व बदल करण्यात येईल.- कमलनयन मृणाल(मुख्य वाणिज्य निरीक्षक, रेल्वे स्थानक वाशिम)

टॅग्स :washimवाशिमIndian Railwayभारतीय रेल्वे