शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : गृह विभागाच्या १७ सेवांना ऑनलाइनची जोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:24 IST

वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाइनची जोड देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी १७ सेवा मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देविहित कालावधीत सेवा मिळण्याची हमी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाइनची जोड देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी १७ सेवा मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र, तक्रारदारास प्रथम खबरी अहवालाची (एफआयआर)ची प्रत पुरविणे, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकरचा) परवाना देणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना नाहरकत परवाना देणे, सभा-संमेलने, मिरवणूक, शोभायात्रा इत्यादींना परवाने देणे, विदेशी नागरिकांचे नागरिकत्वाचे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविणे, पारपत्र पडताळणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार, इत्यादीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवानासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, कागदपत्रे साक्षांकित करणे आदी १७ सेवांचा समावेश आहे. या सेवा पोलीस दलातर्फे ऑनलाइन पुरविण्यासाठी साधारणत: एका महिन्यापूर्वी नियोजन केले होते. सदर सुविधा ऑनलाइन उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशानुसार सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गोपनीय शाखेचे काम पाहणारे सर्व कर्मचारी यांना महाऑनलाइनमार्फत प्रशिक्षणही दिले होते. आता या सेवेला ऑनलाइनची जोड मिळाली आहे. या सुविधांमुळे कामात एकसूत्रता येईल, तसेच पोलिसांचा व नागरिकांचा वेळही वाचेल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला. ऑनलाइन सेवांमध्ये विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे.  

टॅग्स :washimवाशिम