शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

२६ जानेवारीपासून वारकऱ्यांतर्फे स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:00 IST

वाशिम : समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता प्रबोधनाच्या माध्यमातुन २६ जानेवारीपासून गावोगावी स्वच्छतेचा जागर करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता प्रबोधनाच्या माध्यमातुन २६ जानेवारीपासून गावोगावी स्वच्छतेचा जागर करणार आहे. त्यानुसार  जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रवचनकार, कीर्तनकार आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची पूर्वतयारी बैठक १५ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या कै. वसंतराव नाईक सभागृहात पार पडली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, वारकरी सेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष  ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज, वाशिम  जिल्हा वारकरी सांप्रदाय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर सरकटे महाराज, ह.भ.प. शिवशंकर भोयर महाराज, ह.भ.प. अजय महाजन महाराज यांची उपस्थिती होती. २६ जानेवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील निवडक ३० ते ४० वारकरी प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार आहेत. वारकरी साहित्य परिषदे मार्फतच सदर वारकºयांची निवड केली असून, बैठकीत याबाबतच्या सुचना देण्यात आल्या. यावेळी ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज म्हणाले की, कायद्याने समाजात बदल होत नाहीत त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. गावातील स्वच्छतेबरोबरच वारकरी हे लोकांच्या अंत:करणाची स्वच्छता करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हयातुन आलेल्या वारकºयांना सोन्नर महाराज यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे म्हणाले की वाशिम जिल्हा परिषदेने सुरुवातीपासुनच स्वच्छतेच्या चळवळीत गुरुदेव सेवा मंडळ आणि वारकरी यांना सहभागी करुन घेतले आहे. ‘तुझं गावच नाही का तीर्थ’ ही मोहिम राबवुन स्वच्छता दिंडी, शौचालय नसलेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन टाळनाद करण्याचे कार्यक्रम घेतले. यापुढील काळातही शौचालयाचा शंभर टक्के वापर होण्यासाठी जिल्हयात परत एकदा वारकरी संप्रदायाची मदत घेण्यात येणार असल्याचे कापडे यांनी सांगितले.या माध्यमातून शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, गावातील स्वच्छता सुविधांची देखभाल व दुरुस्ती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ओला व  सुका कचरा व्यवस्थापन, शौचालय वापराची सवय व  प्लास्टिक वापर बंदी या प्रमुख बाबींवर वारकरी गावात प्रबोधन  करणार आहेत. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर सरकटे महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल काळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना