शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तुरीने भरली गोदामे; सोयाबीन साठविण्याची अडचण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:23 IST

नाफेडमार्फत जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकर्‍यांचा माल मोठय़ा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रांवर येत आहे. आता खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी शासकीय गोदामांत पुरेशी जागाच नसल्याने प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देसाठवणुकीचा प्रश्न प्रशासनाची डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नाफेडमार्फत जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकर्‍यांचा माल मोठय़ा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रांवर येत आहे. आता खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी शासकीय गोदामांत पुरेशी जागाच नसल्याने प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे. अचानक सोयाबीनची आवक मोठय़ा प्रमाणात झाल्यास पुन्हा खरेदी बंद पडण्याची भीती त्यामुळे निर्माण झाली आहे. यंदा अपुरा पाऊस पडल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर बाजारात सोयाबीनसह इतर शेतमालास हमीभाव मिळेनासे झाले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात नाफेडद्वारे खरेदी करण्याबाबत शासनाने कडक आदेश जारी केले. त्यानंतर जिल्ह्यात नाफेडद्वारे उडीद, मुगाची खरेदीही सुरू करण्यात आली आणि आता मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या खरेदीलाही सुरुवात झाली. काही अपवादात्मक स्थिती वगळता रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम येथील शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीनची आवक वाढत आहे; परंतु खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत पुरेशी जागाच नसल्याने ही खरेदी अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी वाशिम जिल्ह्यात विविध शासकीय योजनेंतर्गत तीन लाखांहून अधिक क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. यातील ८0 टक्के तूर अद्यापही वखार महामंडळाच्या गोदामांतच पडून आहे. त्यामुळे ही तूर हलविल्याशिवाय गोदामांत सोयाबीन ठेवणे शक्य नाही. दरम्यान, शासकीय गोदामांत जागा नसल्याने साठवणुकीची अडचण दूर करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला असला तरी, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुढे सोयाबीन खरेदी निश्‍चितच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव आणि रिसोड येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदामे असून, वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथे खासगी गोदामेही भाड्याने घेण्यात आली आहेत. त्यामध्ये वाशिम येथील शासकीय आणि खासगी गोदामांत मिळून १ लाख ७३ हजार ५00, मंगरुळपीर येथील गोदामांत ४0 हजार, मालेगाव येथील शासकीय आणि खासगी गोदामांत मिळून ६0 हजार आणि रिसोड येथील शासकीय आणि खासगी गोदामांत मिळून २५00 हजार क्विंटल मिळून एकूण २ लाख ७६ हजार क्विंटल तूर अद्यापही पडून आहे.  

फेडरेशनचे अधिकारी घेणार आढावा!राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची नाफेडद्वारे खरेदी सुरू करण्यात आली असली तरी, या खरेदीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाची पंचाईत झाली असून, शेतकरी वर्गात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात शासन स्तरावर माहिती सादर करण्यात आल्यानंतर शासकीय खरेदीचे नियोजन करण्याच्या सूचना मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयास देण्यात आल्या. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनचे  मुंबई येथील व्यवस्थापक विविध जिल्ह्यात भेटी देऊन खरेदीचा आढावा घेत आहेत. वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते बुधवारी अकोला येथे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. 

मालेगाव येथील खरेदीवर तोडगा!जिल्ह्यात कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि वाशिम या सहाही तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले तरी, प्रत्यक्षात मालेगाव आणि मानोरा येथील खरेदी केंद्रावर ग्रेडर नसल्याने येथील खरेदी खोळंबली होती. त्यामधील मानोरा तालुक्याची समस्या सुटली, तर मालेगाव येथे ग्रेडर बुधवारी प्राप्त होणार असल्याने येथील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची समस्या सुटणार आहे. तथापि, या ठिकाणी असलेल्या राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत एक क्विंटल सोयाबीन साठविण्याची जागा नसल्याने येथे खरेदी करण्यात आलेले सोयाबीन इतर ठिकाणी उचलून न्यावे लागणार आहे. अशात सोयाबीनच्या वाहतुकीदरम्यान येणारी घट, ही शेतकर्‍यांच्या वजनातून काही प्रमाणात भरून काढण्यात येण्याचीही शक्यता आहे. - 

टॅग्स :market yardमार्केट यार्ड