शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री सिंचन विहिर योजनेच्या मजुरांना मोबदल्याची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:37 IST

वाशिम - पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत सन २०१७ मध्ये मंजूर वांगी येथील १२ विहीरीवर काम करणाºया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजूरवर्ग वैतागला आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही तोवर तांत्रिकदृष्ट्याही पुढे काम करणे शक्य नाही.   मजुरीची रक्कम आॅनलाइन पद्धतीने संबंधित प्रशासनाकडून बँकेकडे पाठविल्याचे दिसते.मजुरांच्या खात्यात मात्र ती रक्कम दिसत नाही. त्यामुळे ही आॅनलाईन पद्धती अडचणीची ठरत आहे.

 

वाशिम - पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत सन २०१७ मध्ये मंजूर वांगी येथील १२ विहीरीवर काम करणाऱ्या  मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजूरवर्ग वैतागला आहे. सदर मजुरीचे पैसे वाशिम पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजना विभागाने आॅनलाईन पध्दतीने जमा केल्याचे दाखविल्या जाते; परंतु ही रक्कम मजुरांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने मजूर वर्ग चकीत असून, ही रक्कम गेली कोठे, हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. मजुरांच्या खात्यात त्यांचा मोबदला त्वरित जमा करा अशी मागणी पंचायत समिती सदस्य भागवत भोयर यांनी गटविकास अधिकारी वाशिम यांच्याकडे सोमवारी  केली.

वाशिम तालुक्यातील वांगी येथील शामराव झाटे, सुभाष भोयर, सिंधु भायर, गोविंदा भोयर, विमला भोयर, गोपाल भोयर, दत्तू भोयर, सुमन भोयर, गजानन भोयर, गजानन वाकुडकर, लता वाकुडकर, यांना २०१७ मध्ये पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत विहीरी मंजुर झाल्या आहेत. त्यांनी त्या विहिरींचे खोदकाम केले व या विहिरींवर काम करणाऱ्या  मजुराचे हजेरी पत्रक आॅनलाईन भरल्या गेले व त्याचे आॅनलाईन पेमेंटही टाकण्यात आले, असे आॅनलाईनला दिसते; परंतु मजुरांच्या खात्यावर सदर पैसे जमा झाले नाही. त्यामुळे मजुरांच्या मोबदल्याच्या रकमेचे झाले काय, हा प्रश्न मजुरांना पडला असून, केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळत नसल्याने विहीरींची कामेही करण्यास मजूरवर्ग मागेपुढे पाहत आहे, तसेच मजुरांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही तोवर तांत्रिकदृष्ट्याही पुढे काम करणे शक्य नाही. मजुरांच्या हाताला काम व त्वरित कामाचे दाम मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा अंमलात आणला. त्यानंतर या कायद्यात सुधारणा करून या योजनेंतर्गत काम करणाऱ्या  मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला त्वरीत मिळण्याची तरतूदही केली आणि मजुरांचा मोबदला आॅनलाईन पद्धतीने चुकविण्यास सुरुवात केली; परंतु आता त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून मिळणाऱ्या  मजुरीची रक्कम आॅनलाइन पद्धतीने संबंधित प्रशासनाकडून बँकेकडे पाठविल्याचे दिसते; परंतु मजुरांच्या खात्यात मात्र ती रक्कम दिसत नाही. त्यामुळे ही आॅनलाईन पद्धती अडचणीची ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी या प्रकरणात लक्ष घालून मजुरांचा मोबदला अदा करण्याच्या सुचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी मजूरवर्ग करीत असून, या संदर्भात पंचायत समिती सदस्य भागवत भोयर यांनीही वाशिम पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदन सादर करीत मजुरांचा मोबदला तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमguardian ministerपालक मंत्री