शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीच्या अनुदानाची प्रतिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरींचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रतिक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरींचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाची प्रतिक्षा आहे. विहिर बांधकामानंतर पहिल्या टप्प्यातील अनुदान देण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची जोड मिळावी याकरीता विहिरी व सिंचन साहित्याचा लाभ दिला जातो. एका लाभार्थीला जवळपास २.८० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत असून, सन २०१८-१९ या वर्षात कृषी स्वावलंबन योजनेसाठी जिल्ह्याला १५ कोटी १५ लाख रुपये एवढा निधी प्राप्त झालेला आहे तर क्रांतीवीर बिरसा मुंडा योजनेसाठी ५२ लक्ष ४६ हजार रुपये अनुदान जिल्हा नियोजन समितीने मंजूर केले आहे. या दोन्ही योजनांसाठी जानेवारी महिन्यातच लाभार्थींची निवड करण्यात आली. मालेगाव व रिसोड तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा अपवाद वगळता उर्वरीत तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिर बांधकामाचे कार्यारंभ आदेशही दिले होते. त्यानंतर मार्च महिन्यात रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश मिळाले. त्या-त्या टप्प्यातील विहिर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना अनुदान मिळणे अपेक्षित होते. अर्ध्याअधिक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी