शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

 स्वस्त धान्यासाठी रखरखत्या उन्हात प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:48 IST

ग्रामस्थ रांगत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र अनसिंग आणि आसेगाव परिसरात शुक्रवारी दिसून आले. 

लोकमत न्युज नेटवर्कआसेगाव (वाशिम): स्वस्तधान्य दुकानात वेळेत धान्य मिळावे म्हणून ग्रामस्थ रखरखत्या उन्हात गर्दी करीत आहेत. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून काही ग्रामस्थ रांगत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र अनसिंग आणि आसेगाव परिसरात शुक्रवारी दिसून आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली. त्यात जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ निर्धारित करून शिथिलता दिली आहे. किराणा दुकाने, कृषीसेवा केंद्रांसह स्वस्तधान्य दुकानांसाठीही सारखीच वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ सकाळपासूनच दुकांनात गर्दी करीत आहेत. त्यात स्वस्तधान्यावर अधिक अवलंबून असलेल्या गरीब ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली असून, सकाळपासून रांगेत नंबर लावणाºया ग्रामस्थांना रखरखत्या उन्हातच तासनतास उभे राहावे लागत आहे. त्यात उन्हाचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचल्याने ग्रामस्थांचा जीव लाही लाही होत असल्याने बहुतांश ग्रामस्थ उन्हापासून बचाव करण्यासाठी रांगेत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र आसेगाव आणि अनसिंग परिसरात दिसून येत आहे. रखरखत्या उन्हामुळे होणारा त्रास लक्षात घेता सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ अशा वेळेत स्वस्तधान्य वितरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.  किराणासाठीही ग्रामस्थांची लाही लाही गोरगरीब ग्रामस्थ रखरखत्या उन्हात स्वस्तधान्य घेण्यासाठी प्रतिक्षा करीत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागांत दिसत आहेच शिवाय किराणा दुकानांतही वेळेत साहित्य मिळावे म्हणून ग्रामस्थ धावाधाव करीत असून, मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासाठी दुकानदार ग्राहकांना रांगेत उभे करीत आहेत. यामुळे किराणा दुकानांसमोरही रखरखत्या उन्हात ग्रामस्थांच्या जिवाची लाही लाही होत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिम