शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांवरील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 16:29 IST

गेल्या ६ वर्षांपासून एकत्रितपणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित तुकडयांवर १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांकडून गेल्या ६ वर्षांपासून एकत्रितपणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीची दखल घेऊन शासनाने ही योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी २४ जुलै २०१९ च्या शासन निर्णयान्वये संयुक्त समिती गठीत केली; परंतु या समितीला मुदतवाढ देऊनही आपल्या शिफारसी अद्याप सादर करता आल्या नाहीत. त्यामुळे या योजनेसाठी गेल्या सहा वर्षांपासून लढा देणाºया शिक्षण संघर्ष संघटनेतील कर्मचाºयांना समितीच्या शिफारशींची प्रतिक्षा आहे.राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित तुकडयांवर १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यभरातील कर्मचाºयांकडून होत आहे. राज्यात जवळपास ४० हजार कर्मचारी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे याबाबत संघटनांनी वारंवार आंदोलने केली, उपोषण केले, शासन, प्रशासन दरबारी निवेदने दिली. त्यात गतवर्षी शिक्षण संघर्ष संघटनेने १० दिवस उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत शासनाने सदर कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी २४ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये संयुक्त समितीचे गठन केले. सदर समितीला सहा महिन्यांच्या कालावधितही आपल्या शिफारसी सादर करता आल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित तुकडयांवर १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची जुनी पेन्शन योजनेची प्रतिक्षा कायमच आहे.शिफारशीसांठी समितीला पुन्हा मुदतवाढखाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित तुकडयांवर १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीला निर्धारित वेळेत आपला अहवाल सादर करता आला नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०२० च्या शासन निर्णयान्वये या समितीस १ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु या वेळेत सदर समितीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता या समितीला आपल्या शिफारशी शासनाकडे सादर करण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  खासगी अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षण संघर्ष संघटना २०१४ पासून एकत्रित लढा देत आहे. वाशिम जिल्ह्यात या संघटनेचे २५० पेक्षा अधिक सदस्य असून, सर्वांना संयुक्त समितीच्या शिफारशींची प्रतिक्षा लागली आहे.-विजय भड,जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षण संघर्ष संघटना

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र