वाशिम - जिल्ह्यातील सिंचनाचा वाढता अनुशेष कमी करण्यासाठी शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून बॅरेज उभे केले. मात्र, कोट्यवधी लीटर पाणी अडूनही विजेअभावी हे पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य ठरत आहे. विजेसंदर्भातील सुविधांचा ११७ कोटी रुपयांचा प्रस्ताव कधी मंजूर होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.शेतीला सिंचनाची जोड मिळावी, यासाठी शासनातर्फे सिंचन प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. वाशिम जिल्ह्यातही सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ह्यबॅरेजेसह्णची कामे केली आहेत. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५,५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २,१३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. या ११ बॅरेजेस परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी वीजपुरवठा आवश्यक आहे. मात्र, अद्यापह विजेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करणे अशक्य ठरत आहे. या परिसरात विद्युतची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना विद्युतपुरवठ्याची प्रतीक्षा !
By admin | Updated: May 14, 2017 20:03 IST