शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जाची प्रतीक्षा; धार्मिक उत्सवांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:58 IST

शिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्‍या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणीही केली आहे. 

ठळक मुद्देवर्षाकाठी पाच लाख भाविकांचे आवागमन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्‍या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणीही केली आहे. शिरपूर जैन येथे जैन धर्मियांचे जगविख्यात अंतरिक्ष पार्श्‍वनाथ मंदिर आहे. या ठिकाणी विशेष उत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी असतेच, शिवाय दर्शनासाठी सतत येणार्‍या भाविकांची वर्षभरातील संख्या ही एक लाखापेक्षा अधिक आहे. त्याशिवाय येथे असलेल्या जानगीर महाराज संस्थानवर महाशिवरात्रीनिमित्त ७५ हजारांवर भाविक येतात. ओंकारगीर बाबा पुण्यतिथीला ५0 हजार भाविक, आषाढी उत्सवाला २५ हजारांवर भाविक येथे येतात. या ठिकाणी मुस्लीम धर्मियांचाही पवित्र मानला जाणारा मिर्झा मियॉ दर्गाह आहे. येथे उर्स उत्सवाला ६0 हजारांवर भाविक येतात. त्याशिवाय शिरपूर येथे विश्‍वकर्मा जयंती उत्सव मोठय़ा उल्हासात साजरा केला जातो. त्यासाठीही २0 हजार भाविक येथे येतात. बेलसरी महादेव येथील धार्मिक सोहळा, खंडोबा देवस्थानावरील धार्मिक सोहळा आणि नागनाथ देवस्थानावरील धार्मिक सोहळय़ासाठीही २५ हजारांवर भाविक या ठिकाणी येत असतात. उल्लेखनीय बाब अशी की, येत्या काही महिन्यांत या ठिकाणी भगवान अंतरिक्ष पार्श्‍वनाथांच्या मूर्तीची भव्य अशी प्रतीकृती पारसबाग परिसरात स्थापित करण्यात येणार आहे. तब्बल दोन हजार कारागीर ही मूर्ती घडविणार असून, ही मूर्ती घडविण्यासाठी तब्बल ९0 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर राजस्थानमधून येथे काळय़ा पाषाणाची भव्य शिळा आणली आहे. राज्यातील भगवान पार्श्‍वनाथांची ही एकमेव मूर्ती ठरणार असल्याने येथे देशभरातील जैन बांधव दर्शनासाठी येणार आहेत. 

शिरपूर जैन हे देशभर प्रसिद्ध असलेले सर्व धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षाकाठी विविध धर्माचे चार लाखांवर भाविक दर्शनासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. येथील रस्ते रुंद, सुसज्ज असणे, पार्किंगसाठी भव्य असे मैदान असणे, भाविकांच्या वास्तव्याची सोय असणे गरजेचे आहे. यासाठी या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे करीत आहोत. ती मंजूर झाल्यास या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळेल आणि भाविकांसाठी सुविधा उपलब्ध होतील. -शबानाबी मोहम्मद इमदाद, जिल्हा परिषद सदस्य, शिरपूर.  

टॅग्स :washimवाशिम