शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेशासाठी ४९४ बालकांच्या कागदपत्रांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:03 IST

तीन संधी दिल्यानंतरही कागदपत्रे सादर केले नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत खासगी प्राथमिक शाळेत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९७६ पैकी ४९४ बालकांचे आवश्यक कागदपत्रे अद्याप पडताळणीसाठी प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या बालकांचे प्रवेश रखडले असून, तीन संधी दिल्यानंतरही कागदपत्रे सादर केले नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. जिल्ह्यात १०१ शाळांची नोंदणी झाली असून एकूण १०११ प्रवेशित जागा राखीव आहेत. प्राप्त २२५६ अर्जांपैकी पहिल्या लॉटरी पद्धतीत एकूण ९७६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समितीऐवजी स्थानिक पातळीवर संबंधित शाळेतच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. मोफत प्रवेशापासून निवडपात्र बालक वंचित राहू नये म्हणून पालकांना मोबाईलवर संदेशही पाठविण्यात आले. दोन वेळा संदेश पाठवूनही अद्याप ४९४ बालकांनी संबंधित शाळेशी संपर्क साधलेला नाही. ४ आॅगस्टपर्यंत ४८२ प्रवेश कन्फर्म झाले.पडताळणीसाठी कागदपत्रे सादर करण्याच्या सूचनाआरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी बालकाची निवड झाल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित शाळा स्तरावरच होत आहे. कागदपत्र पडताळणीनंतर बालकाला प्रवेश देण्यात येत आहे. संबंधित पालकांच्या मोबाईलवर संदेशही पाठविण्यात आले आहेत. पडताळणीसाठी आतापर्यंत कागदपत्रे सादर न करणाºया पालकांनी लवकरात लवकर कागदपत्रे सादर करून मोफत प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाwashimवाशिम