शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१२३ गावांत पोषण अभियानाची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:19 IST

वाशिम तालुक्यात ४ सप्टेंबर रोजी १२३ गावांत पोषण अभियानाचा जागर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्टÑीय पोषण महिना उपक्रमांतर्गत वाशिम तालुक्यात ४ सप्टेंबर रोजी १२३ गावांत पोषण अभियानाचा जागर केला. पोषण अभियानाची शपथ दिली असून, प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात आली.पोषण अभियानाच्या माध्यमातून नवजात बालकाच्या पहिल्या हजार दिवसात त्याचे पोषण व्यवस्थितरित्या होणे, स्वच्छता, अ‍ॅनेमिया, अतिसार या आजारांवर नियंत्रण मिळविणे, पौष्टीक आहार यासारख्या ५ महत्वपूर्ण घटकांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वाशिम तालुक्यात एकूण १२३ गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. गावोगावी सार्वत्रिक पोषण अभियानाची शपथ घेण्यात आली. पोषण अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांना निर्देश दिले असून, त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत कार्यक्रम व उपक्रमांची रूपरेषा निश्चित केली. अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढण्यात आली. काटा येथे अंगणवाडीतील चिमुकली काव्या देशमुख हिच्या हस्ते या प्रभातफेरीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्यासह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पोषण आहार, गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना आरोग्य व पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यामध्ये आरोग्य व पोषण बाबत जनजागृती व मार्गदर्शन केले जाणार आहे. पर्यवेक्षिका अमिता गिºहे, मीनाक्षी सुळे, बी. बी. वानखेडे यांच्यामार्फत ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर पोषण महिना राबविण्यात येत आहे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम