शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी प्रकाशनाला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:55 IST

३१ जानेवारीला होणार प्रसिद्ध: निवडणूक आयोगाचे निर्देश  लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ...

३१ जानेवारीला होणार प्रसिद्ध: निवडणूक आयोगाचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला असून, अंतिम मतदार यादी प्रकाशनाची तयारीही करण्यात आली आहे. तथापि, या प्रक्रियेत विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मतदार यादी प्रकाशनाची मुदत वाढवून ३१ जानेवारी केली आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३६८९२ नव मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १४७५ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली, तसेच ४४५ मतदारांचे स्थानांतरण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात मतदार यादी वाचन प्रक्रिया राबविण्यात आली आणि या अंतर्गत मतदारांकडून दाखल करण्यात आलेल्या हरकती आणि आक्षेपानुसार दुरस्त्या करून एकूण ४७८०५ मतदारांची यादी अद्ययावत करण्यात आली. या नंतर तयार झालेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारी जिल्हा निवडणूक विभागाने केली आहे; परंतु राज्यातील काही जिल्ह्यांच्या याद्यांची दुरुस्ती तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असून, राज्यात एकाच वेळी सर्व जिल्ह्यांची मतदार यादी प्रसिद्ध व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने पूर्वी २० जानेवारीपर्यंत दिलेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत वाढवून ३१ जानेवारी केली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक