शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन; वाशिममधील वाईन शॉपीला ठोकले ‘सील’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:40 IST

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दखल घेऊन ९ मे रोजी एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला सील ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील एका वाईन शॉपीमध्ये चढ्या दराने होत असलेली मद्यविक्री, शासकीय नियमानुसार ग्राहकास मद्य जवळ बाळगण्याचा परवाना न देणे यासह मद्यविक्री करताना ‘फिजीकल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ८ मे रोजी उघडकीस आणला होता. या वृत्ताची जिल्हाधिकारी ह्रषीकेश मोडक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दखल घेऊन ९ मे रोजी एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला सील ठोकले.राज्य सरकारने ‘कन्टेनमेंट झोन’ वगळता मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी दिली. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात वाईन शॉप , देशी दारू व बियर शॉपीची दुकाने ६ मे पासून सुरू करण्यात आली; मात्र, त्यासाठी प्रशासनाने कठोर नियमही घालून दिले होते; मात्र मद्यविक्री करणारे दुकानदार व ग्राहकांनी ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ पाळणे बंधनकारक असताना जैस्वाल यांच्या दुकानसमोर त्याचे उल्लंघन झाल्याची बाब दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या निदर्शनास आली. यासह नियमापेक्षा अधिक दराने मद्यविक्री केली जात असल्याच्या प्राप्त तक्रारींची शहानिशा केली असता हा प्रकारही चौकशीत निष्पन्न झाला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला ९ मे रोजी सील ठोकण्याची धडक कारवाई केली. या कारवाईमुळे नियम न पाळणाऱ्या अन्य मद्यविक्रेत्यांमध्येही दहशत निर्माण झाली.

वाशिम येथील एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीमधून नियमापेक्षा अधिक दराने मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची शहानिशा केली असता, हा प्रकार निष्पन्न झाला. यासह इतरही नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे अखेर संबंधित मद्यविक्रेत्याच्या दुकानास सील ठोकण्याची कारवाई केली.- अतुल कानडेअधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क

 

टॅग्स :washimवाशिमExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग