शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे  उल्लंघन; ग्राहकांना हाॅटेलमध्ये बसून दिले जातेय जेवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 12:27 IST

Reality Check काही हाॅटेलव्यावसायिक  चक्क हाॅटेलमध्ये बसून ग्राहकांना सेवा देत असल्याचे ५ मार्च राेजी ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात वाढता काेराेना संसर्ग पाहता हाॅटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत, परंतु या नियमांचे सर्रास उल्लंघन हाेत असून, काही हाॅटेलव्यावसायिक  चक्क हाॅटेलमध्ये बसून ग्राहकांना सेवा देत असल्याचे ५ मार्च राेजी ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशांना ८ मार्च २०२१ रोजीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी मुदतवाढ दिली हाेती संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बस स्थानक तसेच खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोल पंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. या उद्योगांचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी देण्यात आली हाेती. तसेच घरपोच दूध वितरण, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या घरपोच वितरणास सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली हाेती. यासंदर्भात ‘लाेकमत’च्या वतीने ५ मार्च राेजी शहरातील काही हाॅटेल, रेस्टाॅरंट, भाेजनालयांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी हाॅटेल व्यावसायिक चक्क ग्राहकांना हाॅटेलमध्ये प्रवेश देत असल्याचे दिसून आले. यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या भागातील हाॅटेलची केली पाहणी  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काही हाॅटेलचालक उल्लंघन करीत असताना संबंधितांकडून काेणतीही कारवाई केली जात नसल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. वाशिम शहरातील पुसद नाका, रिसाेड राेड, अकाेला रस्त्यावरील हाॅटेलमध्ये हा प्रकार सर्रास दिसून आला. असाच प्रकार शहरातील इतरही हाॅटेलमध्ये सुरू असल्याची माहिती असून, याकडे संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

छुप्या मार्गाने ग्राहकांना प्रवेशशहरातील तसेच शहराबाहेरील काही हाॅटेलमध्ये समाेरून दरवाजा बंद करून मागच्या दरवाजाने छुप्या पद्धतीने प्रवेश दिला जात असल्याचेही ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. हाॅटेलचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून हाॅटेलसमाेर एक कर्मचारीही उभा ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक