शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्त्याने दिला मजुरांना रोजगार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:05 IST

तेंदूपत्ता तोडणीतून मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे.

- साहेबराव राठोडलोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम): वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागांत दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने शेतमजुरांच्या हाताला कामे मिळेनासी झाली आहेत. अशात वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता तोडणीमुळे शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याचे चित्र दिसत असून, तेंदूपत्ता तोडणीतून मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे.वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू अर्थात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर जिल्ह्यातील शेतमजुरांना कामे मिळत नाहीत. परिणामी दरवर्षी खरीप हंगामानंतर हजारो मजूर रोजगारासाठी मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह गुजरात, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात स्थलांतर करतात. यंदाही जिल्ह्यातील हजारो शेतमजुरांनी रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर केले आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत असतानाच शेतमजुरांच्या कुटूंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.  अशा स्थितीत वनविभागाकडून तेंदूपत्त्याचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांचा अनेक कुटूंबाना आधार मिळाला आहे. सर्वसाधारण १०० पानांसाठी १८८ रुपये त्यांना  मोबदला मिळत आहे. जंगलात फिरुन तेंदू झाडांची पाने तोडायची एका ठिकाणी ही पाने प्रत्येकी पन्नास प्रमाणे एकास एक जोडायची आणि दोन्ही मिळून उलटी सरकी जोडणी करून एक पुडा तयार करायचा, असा या कामाचा प्रकार आहे. कामगार जेवढी पाने तोडतील. तेवढा मोबदला त्यांना मिळतो. त्याशिवाय शासनाकडून या कामांना बोनसही दिला जातो. त्यामुळे या व्यवसायातून जिल्ह्यातील शेकडो कु टुंबाचे उदरभरण होत असल्याचे दिसत आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथील ३० ते ३५ परिवारांतील कामगारांचाही समावेश असून, सकाळी ३ ते ४ वाजता हे कामगार जंगलात जाऊन तेंदूपत्ता तोडून आणतात आणि त्यानंतर सकाळी १० वाजतापासून घरी संपूर्ण परिवार पानांचे पुडे तयार करीत बसतात.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर