शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

विविध मागण्यांसाठी करंजीवासियांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:33 IST

जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - प्रलंबित कामांना प्राधान्य न देता नवीन सिंचन विहीर प्रकरणाची चौकशी करावी, गत तीन वर्षांचे सेसनिहाय आॅडिट करावे यासह अन्य विषयांकडे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे. करंजी गरड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित कामांना प्राधान्य न देता नवीन सिंचन विहिरीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन रिसोड गटविकास अधिकाºयांनी दिले होते. तथापि, अद्याप चौकशी करण्यात आली नसल्याने याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करावी या मागणीसाठी एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी उपोषण आंदोलन सुरू केले. त्याचबरोबर गावठाणमधील निवासी अतिक्रमणाची प्रकरणे गटविकास अधिकाºयांमार्फत उपविभागीय अधिकाºयांकडे तातडीने सादर करावी, मागील तीन वर्षांचे ग्रामपंचायतचे सेसनिहाय आॅडिट करावे तसेच गाव नमुना १ ते ११ अद्ययावत आहेत की नाही याची तपासणी करावी अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली. सिंचन विहिरी, वृक्षारोपण कामांची तपासणी व मजूर उपस्थिती न पाहता मजूरांना पैसे काढून दिले जातात, या प्रकरणाची चौकशी करावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण आंदोलन पुकारले आहे. सोमवारी आंदोलनस्थळी रिसोड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट देऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड