शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहतुक पोलीसांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 20:03 IST

वाशिम :  भुसावळ येथील चोरट्यांच्या टोळीचा वाशिम शहरात धुमाकुळ सुरू असल्याचे लक्षात येताच वाहतुक पोलीसांनी या टोळीतील दोन चोरट्यांना सिनेस्टाईल पकडून शहर पोलीसांच्या स्वाधीन केले. या चोरट्यांनी चोरलेले रोख सहा हजार रूपये त्यांच्या खिशामध्ये आढळून आले. ही घटना वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात २१ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता घडली. 

ठळक मुद्देदोघांना अटक : एक पसार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  भुसावळ येथील चोरट्यांच्या टोळीचा वाशिम शहरात धुमाकुळ सुरू असल्याचे लक्षात येताच वाहतुक पोलीसांनी या टोळीतील दोन चोरट्यांना सिनेस्टाईल पकडून शहर पोलीसांच्या स्वाधीन केले. या चोरट्यांनी चोरलेले रोख सहा हजार रूपये त्यांच्या खिशामध्ये आढळून आले. ही घटना वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात २१ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता घडली. गोरेगाव (ता. सेनगाव जि. हिंगोली) येथील काही युवक वाशिम शहरात देवीची मुर्ती खरेदी करण्यासाठी आले होते. या युवकापैकी सुदर्शन प्रभाकर पवार हा शिवाजी चौक परिसरात असलेल्या जावळे मुर्तीकाराजवळ आपल्या खिशातील पैसे मोजत असताना अचानक एक युवक गर्दीमध्ये घुसला. या भामट्याने मोठ्या हातचलाखीने पवार याचे हातामधील रोख सहा हजार रूपये जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. त्याचा पाठलाग केला परंतू तो आढळून आला नाही. त्यानंतर ही टोळी पाटणी चौकामध्ये आली. पाटणी चौकामध्ये बाजार घेत असताना नारायण ग्यानुजी घुले (रा. झाकलवाडी ता.जि. वाशिम) यांचे खिशामधील १६०० रूपये एका चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेले. घुले यांनी आरडाओरड केली असता पाटणी चौकामध्ये कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्योती विल्लेकर यांनी प्रसंगावधान राखून आपल्या कर्मचाºयांना चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याच्या सुचना दिल्या. वाहतुक पोलीस सचिन जाधव, राहुल वानखेडे, स्विटी कोटरवार, चालक मनोहर राठोड, होमगार्ड संदिप पोहनकर यांनी संशयीत चोरट्याला पकडण्यासाठी अक्षरश: सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग केला. वाहतुक पोलीसांच्या सतर्कतेमुळे मुकेश सुंदºया पवार (वय २५) व संजय सचिव गुजर (वय १९) या दोघांना जेरबंद करण्यात यश आले. या टोळीतील अन्य चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही चोरट्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख सहा हजार रूपये आढळून आले. या दोघांविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्याला पकडणाºया वाहतुक पोलीसांचे नागरिकांमध्ये कौतुक केल्या जात आहे. 

हिंगोली नाक्यावरील सायकल दुकान फोडलेवाशिम :  कृषी उत्पन्न बाजार समिती संकुलामध्ये असलेल्या गुणवंता आत्माराम भोयर यांच्या सायकल दुकानचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानामधील दोन सायकली, सायकलचे कुलूप व गल्यातील चिल्लर असा अंदाजे एकुण पाच हजाराचा ऐवज लंपास केला. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली. घटनास्थळावर सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

क्षुल्लक कारणावरून चाकुहल्ला वाशिम : शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून सुनिल नंदकिशोर रिंढे (रा. काळे फैल, वाशिम) याचेवर शैलेश वस्ताद (रा. जांभरून नावजी , वाशिम) याने कांदा कापण्याचे चाकुने पायावर वार केला. यामध्ये रिंढे याला गंभीर दुखापत झाली. ही घटना २१ सप्टेंबरला सकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. या घटनेची रिेंढे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असुन पोलीसांनी शैलेश वस्ताद याचेविरूध्द भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.