शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

विद्यूत उपकेंद्रांची कामे अडकली ‘लालफितशाहीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 14:57 IST

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून ११ बॅरेजेस उभारण्यात आले. त्यापैकी ९ बॅरेजेससह अन्य ३ अशा १२ ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून ११ बॅरेजेस उभारण्यात आले. त्यापैकी ९ बॅरेजेससह अन्य ३ अशा १२ ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारले जाणार आहेत. त्यासाठी लागणाºया ९२ कोटी रुपये निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाकडून महावितरणकडे ५ एप्रिल २०१८ रोजी सुपूर्द करण्यात आला. त्यास येत्या ५ आॅक्टोबरला ६ महिने पूर्ण होतात. असे असताना कामे अद्याप सुरू झाली नसून यासंदर्भातील निविदा प्रक्रियाच अद्याप पूर्ण झाली नसल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेती कोरडवाहू असून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची उपजिविका पारंपरिक पिकांवरच विसंबून आहे. सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने फळपिके, भाजीपाला यासह बागायती क्षेत्राचे प्रमाण तुलनेने अल्प आहे. हे चित्र पालटण्यासाठी जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगेचे पाणी अडविण्यासाठी शासनाने आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी अशा ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र, कृषिपंपांसाठी लागणारी वीज जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत ही बाब शक्य होणार नसल्याचे शासनाने ९२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजूरी देवून पहिल्या टप्प्याचा २५ कोटी रुपये निधी महावितरणला दिला. त्यातून आतापर्यंत कामे सुरू होणे क्रमप्राप्त होते. मात्र, अद्याप निविदा प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १० आॅक्टोबरपर्यंत ‘टेंडर’ खुलतील, त्यानंतर कंत्राटदार निश्चित करून प्रत्यक्ष कामे सुरू होतील.- आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण