शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:27 IST

उमेदवारांची घोषणा झाली नसतानाही प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याच्या वावड्या जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत.

- दादाराव गायकवाड  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात युती, आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली नसतानाही प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याच्या वावड्या जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. सोशल मिडियावर याबाबत चर्चा सुरू असली तरी, याबाबत पदाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा झाली नसल्याचे सांगत अधिक वक्तव्य करण्यास नकार दिला. दरम्यान, जिल्ह्यातील युतीच्या जागा वाटपात तिसºया मित्रपक्षाचीही चर्चा जोरात सुरू आहे. तथापि, युतीच्या पदाधिकाऱ्यांचे घटस्थापनेच्या मुहूर्तावर होणाºया चर्चेकडेच लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यात निवडणूक ज्वर चांगलाच वाढला आहे. ठिकठिकाणी निवडणुकीच्या चर्चा झडत आहेत. सोशल मिडियावरही यासंदर्भातील चर्चेला उधाण आले असून, कथित सूत्रांचा हवाला देऊन निवडणूक आणि उमेदवारांबाबत संदेश पाठविण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित असल्याने या मित्रपक्षांनी नियोजनानुसार आपापल्या मतदारसंघातच तयारी केली असली तरी, वाशिम रिसोड मतदारसंघात काँग्रेसकडून, तर कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे, तर शिवसेना-युतीचा निर्णय झाला नसताना दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी तिन्ही मतदारसंघात तयारी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचीही हिच स्थिती आहे. त्यामुळे या तिन्ही आघाड्यांच्या इच्छुकांना उमेदवारी निश्चित होण्याची, मतदारसंघ निश्चित होण्याची प्रतीक्षा लागली आहे. त्यातच आता विविध पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत.यात प्रामुख्याने भाजपसाठी कारंजा आणि वाशिम मतदारसंघ सुटल्याची, तर रिसोड मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सुटल्याची चर्चा पसरविली जात आहे.त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचाही कारंजा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी अमित झनकांचे नाव नसल्याची पोस्ट व्हॉटसअ‍ॅपवर फिरतांना दिसून येत आहे. सोशल मिडियावर पसरविण्यात आलेल्या उमेदवार निश्चितीच्या वावड्यांमुळे शिवसेनेच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली असून, घटस्थापनेच्या दिवशी मुंबई येथे होणाºया चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या पदाधिकाºयांनी मात्र या वावड्यांना फेटाळेले आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019