विदर्भ राज्याचा विरोध करणाऱ्यांचा नोंदविला निषेधवाशिम : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने १ मे महाराष्ट्र दिनी स्थानिक डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविला. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच विदर्भ राज्य होण्यासाठी विदर्भवादी कार्यकर्ते स्वत:चे बलीदान देण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, असा निर्धार यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. विदर्भ राज्याच्या ध्वजारोहनानंतर समितीच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. यावेळी वेगळ्या विदर्भाचा विरोध करणारे लोकप्रतिनिधी व राज्यकर्त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाच्या तीसऱ्या टप्प्यातील ‘जवाब दो’ या आंदोलनांतर्गत जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना भ्रमणध्वनी करुन वेगळा विदर्भ राज्य कधी देणार, याबाबत जाब विचारण्यात आला. या आंदोलनामध्ये युवा आघाडीचे विभागीय सचिव पवन राऊत, जिल्हाध्यक्ष विनायक जवळकर, विभागीय उपाध्यक्ष सौरभ गंगावणे, जनमंचचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, शेतकरी नेते नारायण विभुते, विदर्भवादी दत्तराव धांडे, विभागीय सरचिटणीस निखिल गवळी, शेषराव धांडे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, सौरभ गायकवाड, पंकज गाडेकर, राजू चौधरी, सागर भिसडे, नारायण विभुते, अक्षय गोदमले, भुषण मोरे, शाम पांढरे आदी विदर्भवादी युवक व नागरिकांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रदिनी फडकला विदर्भ राज्याचा झेंडा!
By admin | Updated: May 2, 2017 00:49 IST