विवेकानंद ठाकरे/रिसोडयेथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाभोवती व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे दवाखान्यातील कर्मचार्यांसह पशुपालक व परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दवाखान्याच्या इमारतीला ४६ वष्रे झाली असल्यामुळे तिला अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे.येथील पशुचिकित्सालयाची निर्मिती १९६६ ला झाली आहे. पशुचिकिल्सालयाचे क्षेत्रफळ दोन एकर चार आर आहे. या परिसरात पशुवैद्यकीय विकास अधिकारी, कर्मचारी वर्गाचे निवासस्थाने आहेत. सुरुवातीच्या काळात हा परिसर स्वच्छ व इमारती चांगल्या होत्या. आजमितीस परिसरात सर्वत्र घाण, इमारतीची निवासस्थानाची पडझड झाल्याने कर्मचारी वर्ग राहत नाहीत. . चिकित्सालयाची संरक्षण भिंत पडल्यामुळे नागरिक या ठिकाणी शौचास बसतात यामुळे दररोज डुकरांचा मुक्तसंचार असतो. कर्मचार्यांच्या बसण्याच्या ठिकाणची छताची कौल फुटलेली आहेत. यामुळे पाऊस सुरु असतांना कर्मचार्यांना बसायला सुध्दा नीट जागा नाही. शहरातील या पशुचिकित्सालयाला शहरासह नजीकच्या घोंसरवाडी, निजामपुर, मांगवाडी, आगरवाडी, शेलूखडसे, पाचांबा, करडा, सवड, चिंचाबाभर, कंकरवाडी, मुंगसाजी नगर अशा अकरा गावातील कामांचा व्याप आहे व येथे तालुका पशुधन अधिकारी व एक परिचर असे दोघेच कर्मचारी काम पाहतात. पंचायत समितीचे एस.एल.कांबळे हे पशुधन विस्तार अधिकारी म्हणून सहाय्य करतात.येथील चिकित्सालयात एक पशुधन पर्यवेक्षक, एक पट्टीबंधक व दोन परिचर असे पाच ते सहा कर्मचार्यांची कमतरता आहे. येथील औषधांचा साठा वरिष्ठ स्तरावरुन पुरविल्या गेला असून औषधी व रोगप्रतिबंधक लस या कामचलाऊ म्हणजे बोगस आहेत. गुरांचा आजार बरा होण्यास या औषधामुळे विलंब लागतो व तेवढे परिणामकारक नाहीत. येथे गुरांसाठी एक्सरे मशीन उपलब्ध आहे व जवळपास त्याची किंमत ३0 लक्ष रुपये एवढे आहे.
पशुचिकित्सालय ‘कोमात’
By admin | Updated: December 9, 2014 23:20 IST