शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘व्हेंटिलेटर्स ’ची सुविधा चार पटीने वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:42 IST

‘व्हेंटिलेटर्स’ची सुविधा चार पटीने वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवघ्या महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या दीड हजारांनी वाढून २२५० वर पोहोचली. त्यामुळे आरोग्य विभागावर ताण वाढला आहे. आता आवश्यक वेळी गंभीर रुग्णांवर उपचार सोयीचे व्हावेत म्हणून ‘व्हेंटिलेटर्स’ची सुविधा चार पटीने वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जारी केलेले लॉकडाऊन काढून आता अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात अनलॉक-३ च्या अमलबजावणीनंतर कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवघ्या महिनाभरातच जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांची भर पडली आहे. ही बाब अतीशय गंभीर आहे. त्यातच जनतेमध्ये कोरोना संसर्गाची भीती पूर्वीसारखी राहिली नाही. अनेक जण लक्षणे दिसत असतानाही खबरदारी म्हणून तपासणीसाठी तयार होत नाहीत. असे रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचल्यानंतर रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर (जीवनदायी प्रणाली) ठेवावे लागते. जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येचा विचार करता पुढे परिस्थिती गंभीर होण्याची भीती असते. यावेळी आरोग्य विभाग आणि प्रशासनाची धांदल होऊन गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, या उद्देशाने जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सची संख्या चार पटीने वाढविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १० ‘व्हेंटिलेटर्स’ उपलब्ध असून, येत्या काही दिवसांत यात ३५ ‘व्हेंटिलेटर्स’ची भर पडून ती ४५ पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अतीगंभीर रुग्णांवर उपचार करणे आरोग्य विभागाला सोयीचे होणार आहे. 

‘आॅक्सीजन बेड’ही वाढणार जिल्ह्चात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाय योजना करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेतील सोयीसुविधांत वाढ करणे क्रमप्राप्त असल्याने प्रशासनाने ‘व्हेंटिलेटर्स’ वाढविण्यासह ‘आॅक्सीजन बेड’ची संख्याही वाढविण्याची तयारी केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात शासकीय रुग्णालये, खासगी कोविड सेंटर मिळून कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी १३५० खाटांची सुविधा आहे. त्यात २८० आॅक्सीजन बेड आहेत. आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ‘आॅक्सीजन बेड’ची संख्याही वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.  

जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता पुढील काळात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास उपचारात अडचणी येऊन गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात येत आहेत. त्यात ‘आॅक्सीजन बेड’, ‘व्हेंटिलेटर्स’सह कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची तयारी सुरू असून, येत्या काही दिवसांत जिल्ह्यात एकूण ४५ ‘व्हेंटिलेटर्स’ उपलब्ध असतील. - शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या