शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथील चेकपोस्टवर वाहनांची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:11 IST

जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण आढळून व तोही बरा झाला असल्याने जिल्हा कोरोनामुक्त आहे.  यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.  त्यानुसार वाशिम येथील चेकपोस्टवर वाहनांची झाडाझडती घेऊन सर्व बाबींची पडताळणी करुनच वाहने सोडण्यात येत आहे. विनापरवानगी वाहनाला परत पाठविल्या जात आहे. यासाठी मोठा पोलीस ताफा शहरातील चेकपोस्टवर ठेवण्यात आला आहे. संचारबंदी व जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून, रीतसर पूर्वपरवानगी न घेता जिल्ह्यात येणाº्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठीच जिल्ह्याबाहेर अथवा राज्याबाहेर जाण्याची परवानगी देण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून अशी परवानगी देण्याचे अधिकार राज्याचे पोलीस महासंचालक आणि संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातून वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कारणासाठी वाशिम जिल्ह्यात येवू इच्छिणाº्या व्यक्तींनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही विभागाने, अधिकाº्यांनी दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याने बाजुच्या जिल्हयातील वाहने जिल्हयात येणे थांबली आहेत.तसेच जिल्हयातील वाशिमसह कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, रिसोड व मंगरुळपीर तालुक्यातही असलेल्या चेकपोस्टवर पोलीसांकडून कडक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. विनापरवानगी वाहनांनी जिल्हयात प्रवेश करण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.

- अत्यावश्यक कामाशिवाय जिल्हा बाहेर परवानगी नाहीअत्यावश्यक कारणासाठी जिल्हा बाहेर जायचे असल्यास परवानग्या देण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. याकरिता एका पोर्टलद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. तो मंजुर करण्याचा अधिकार पोलीस विभागाला आहे.

टॅग्स :washimवाशिम