वाशिम: वाहनासंबंधीची गैरसोय टाळण्यासाठी आता महिन्यातील एक दिवस तालुकास्तरावर वाहन नोंदणी, तपासणी व अन्य प्रकाराची सुविधा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने उपलब्ध केली आहे. जानेवारी ते जून महिन्यातील तालुकास्तरीय 'अँक्शन प्लॅन' तयार करण्यात आला. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर नोंदणी, तपासणी, वाहन कर वसुली, वाहन चालक परवाना आदी कामकाजासाठी जिल्हय़ातील वाहनधारकांना जिल्हा मुख्यालयी अर्थात वाशिम येथे यावे लागते. यामध्ये पैसा व वेळेचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी तालुकास्तरावर विश्रामगृहात एक दिवसीय शिबिर घेऊन वाहनविषयक सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प उपप्रादेशिक परिवहन विभागाने सोडला होता. या संकल्पाची नववर्षात अंमलबजावणी होत असून, शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी रिसोड येथून करण्यात आला. वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती (परवाना) आदी कामे तालुकास्तरावर एक दिवसीय शिबिरातून जानेवारी ते जून २0१६ या दरम्यान होणार आहेत.
वाहन नोंदणी व तपासणीची सुविधा आता तालुकास्तरावर
By admin | Updated: January 11, 2016 01:46 IST