वाशिम : येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर मोक्षदा पाटील रूजू होणार आहेत.गुरूवारी सायंकाळी शासनाने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची बदली यादी जाहिर केली. या यादीत वाशिम पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मोक्षदा पाटील यांची नियुकी झाली. साधारणत: दीड वर्षापूर्वी प्रशांत होळकर यांनी वाशिमचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच चोरीच्या घटनांतील मुद्देमाल हस्तगत करण्यावरही त्यांनी भर दिला होता. त्यांचे जागेवर आता जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिलेल्या मोक्षदा पाटील रूजू होतील.
वाशिमच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील रूजू होणार
By admin | Updated: May 1, 2017 02:11 IST