शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुक्यातील १७० अंगणवाड्यांमध्ये पोषण अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 15:22 IST

वाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत वाशिम तालुक्यातील १७० अंगणवाडी केंद्रांत ८ ते २० मार्च दरम्यान पोषण पंधरवडा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत वाशिम तालुक्यातील १७० अंगणवाडी केंद्रांत ८ ते २० मार्च दरम्यान पोषण पंधरवडा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत बालक, युवक, किशोरी आणि महिलांमध्ये पोषण आहार मार्गदर्शनासह कुपोषित बालकांची तपासणी, तसेच गरोदर माता व विद्यार्थी-पालकसभा आणि रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ८ ते २२ मार्च दरम्यान पोषण पंधरवडा राबविण्यात येत आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले  यांचे मार्गदर्शनात वाशिम प्रकल्पातील एकूण १७० अंगणवाड्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. वाशिम तालुक्यातील अडोळी, अनसिंग, काटा, पार्डी टकमोर, तोंडगाव, उकळीपेन या बिट मधील सर्व केंद्रांमध्ये  किशोरी आणि बालकांच्या आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. किशोरींना आणि महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.  स्वजाणीव, कायदेशीर अधिकार,  जीवन कौशल्य आणि निर्णय क्षमतेबाबत या कार्यक्रमात माहिती देण्यात आली. गावोगावी रॅली काढून जनजागृती करण्यात आली. बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, पर्यवेक्षिका अमिता गिर्हे, मीनाक्षी सुळे यांचे नियोजनात पंधरवडा साजरा केला जात आहे.  २२ मार्चपर्यंत विविध कार्यक्रम घेऊन अंगणवाडी केंद्रांमध्ये पालकांना विविध विषयाची माहिती देणे व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :washimवाशिम