शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त तामकराड येथे विविध कार्यक्रम ; महाप्रसादाचे होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 14:06 IST

मालेगाव - महाशिवरात्रीनिमित्त मालेगाव तालुक्यातील श्री ऋषी महाराज संस्थान तामकराड येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.महाशिवरात्रीला १८ क्विंटल उसळीचे वाटप करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण होणार आहे.

मालेगाव - महाशिवरात्रीनिमित्त मालेगाव तालुक्यातील श्री ऋषी महाराज संस्थान तामकराड येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. महाशिवरात्रीला १८ क्विंटल उसळीचे वाटप करण्यात येणार आहे तर १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन प.पू. बबन महाराज यांनी केले आहे.तामकराड संस्थानवर  महाशिवरात्री उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संस्थान परिसरात कमानी उभारने, मंदिराचे रंगकाम , आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामे पूर्ण झाली आहे. १३ फेब्रुवारी रोजी रोज रात्री ८.३० ते १० वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाचे वितरण १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत केले जाणार आहे. पर्वत कडेला हे संस्थान आहे. श्री चंदनशेष महाराजांच्या वास्तव्याने सदर ठिकाण पावन झाले आहे. येथे दर सोमवारी नागपंचमीला  भाविक  मोठ्या संख्येने दर्शनास येतात. मेडशी ते मुंगळा या रस्त्यावरील रेगाव येथून तामकराड येथील संस्थानवर जाता येते. डोंगरकिन्ही येथूनही तामकराड संस्थानवर जाता येते. संस्थानवर आयोजित विविध कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन प.पू. बबन महाराज यांनी केले आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील चांडस येथील श्री चंद्रेश्वर संस्थानवरदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रिला येथे भाविक मोठया संख्येने दर्शनास येतात. महशिवरात्रीला येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. गर्भगृहामध्ये श्री चंद्रेश्वरांचे शिवलिंग आहे. मंदिराचे बांधकाम दक्षिण भारतीय पध्दतीचे आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. त्यामध्ये शिववाहन नंदीची मुर्ती आहे. सभामंडपात श्री रामदेव बाबांची मूर्ती आहे . मंदिर परिसरात श्री कृष्ण मंदिर  आहे. मंदिरालगत बाराही महिने पाणी असलेली बारव (विहीर) आहे. तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तत्कालीन आमदार विजयराव जाधव यांच्या स्थानिक विकास निधीमधून १० लाख रुपये अंदाजित खर्चाचा सभामंडप  येथे बांधण्यात आला आहे. मालेगाव- मेहकर राज्यमहामार्गावर मालेगावपासून १० किमी अंतरावर हे संस्थान आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवMahashivratriमहाशिवरात्री