शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण विभागाच्या सचिवांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या विविध समस्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:28 IST

तकरी उत्पादक कंपनीच्या शेतकºयांनी कृषीविषयक विविध समस्या मांडून डवले यांचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले ८ सप्टेंबर रोजी वाशिम येथे एका बैठकीनिमित्त आले असता, शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकºयांनी कृषीविषयक विविध समस्या मांडून डवले यांचे लक्ष वेधले.शेतकरी समुहाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची संकल्पना राज्य सरकारने प्रत्यक्षात साकारली आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळपास २५ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. या कंपन्यांना भेडसावणाºया समस्या शेतकºयांनी जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासमोर मांडल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत महाबीज, कृभको, कृषी विज्ञान केंद्राला बिजोत्पादन व वितरणासाठी अनुदान दिले जाते, या तत्वाप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनीलादेखील अनुदान देण्यात यावे, सीड हबसाठी खासगी उद्योगांप्रमाणेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान द्यावे, गत दहा वर्षाच्या कालावधीत ज्या वाणांच्या बियाण्याला जास्त मागणी होती, अशा प्रमाणित, पायाभूत बियाण्याला बियाणे उत्पादन अनुदान मिळावे, पेरणी तंत्रज्ञानाला शासकीय स्तरावरून प्रोत्साहन देण्यात यावे, राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच वित्त पुरवठा करणाºया सहकारी संस्थांद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्जपुरवठा करण्यात यावा, जिल्हास्तरावर शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संघ स्थापन झाले असून, त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी ‘कृषी मॉल’ उभे करण्यासाठी अर्थसहाय्य, मदत करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीच्या पदाधिकाºयांनी एकनाथ डवले यांच्याकडे केल्या. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे पंजाबराव अवचार, विलास गायकवाड, गजानन अवचार, दिलीप फुके, शिवाजी भारती, राजू इंगळे, ज्ञानेश्वर ढेकळे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी