शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:17 IST

वाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही हजयात्रेला जाणाºया जिल्ह्यातील हजयात्रेकरूंसाठी २१ जुलै रोजी लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देहुजेफा नगर येथील तवक्कल फंक्शन हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान हे कार्यक्रम पार पडणार आहेत. हज प्रशिक्षण तथा लसीकरण शिबिरात मेनिंजायटिस, एन्फ्लूएंझाची लस, तसेच पोलिओचे डोज दिले जाणार आहेत.जिल्हा प्रशिक्षक अल्हाज जावेद अली फारुखी, हज प्रशिक्षक प्रा. हाजी गफ्फार गाजी आणि हाजी आरिफ भोगानी हज यात्रेकरूंना प्रशिक्षण देतील.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही हजयात्रेला जाणाºया जिल्ह्यातील हजयात्रेकरूंसाठी २१ जुलै रोजी लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक हुजेफा नगर येथील तवक्कल फंक्शन हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान हे कार्यक्रम पार पडणार आहेत. वाशिम येथे आयोजित हज प्रशिक्षण तथा लसीकरण शिबिरात मेनिंजायटिस, एन्फ्लूएंझाची लस, तसेच पोलिओचे डोज दिले जाणार आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा प्रशिक्षक अल्हाज जावेद अली फारुखी, हज प्रशिक्षक प्रा. हाजी गफ्फार गाजी आणि हाजी आरिफ भोगानी हज यात्रेकरूंना प्रशिक्षण देतील. त्यानंतर लसीकरण शिबिर पार पडणार आहेत. हज कमिटी आॅफ इंडिया आणि टूरमार्फत जाणाºया हजयात्रेकरूंना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा हज प्रशिक्षक व महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे लसीकरण इंन्चार्ज जावेद अली फारूखी आणि वाशिम जिल्हा हज प्रशिक्षक प्रा. गफ्फार गाजी यांनी केले आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातून यंदा हज कमिटी इंडियामार्फत जाणाºया १६५, तर टूरच्या माध्यमातून हजयात्रेला जाणाºया २९ यात्रेकरूंना विशेष मेनिंजायटिस, एन्फ्लूएंझा लस आणि पोलिओ लसीकरण शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते आरोग्य व प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या शिबिरात लसीकरण करण्याची जबाबदारी शासकीय रुग्णालयाच्या पथकाकडे सोपविण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अल्हाज जावेद अली फारूखी, वाशिमचे प्रशिक्षक प्रा. गफ्फार गाजी, हाजी मोहम्मद एजाज, मंगरूळपीरचे डॉ. जमील, कारंजा लाडचे हाजी मोहम्मद आरिफ भोगानी यांची प्रमुखता उपस्थिती राहील. हज प्रशिक्षणात सहभागी होणाºया सर्व हजयात्रेकरूंना स्वत:सोबत रक्तगट कार्ड, पासपोर्टच्या सत्य प्रतीलिपी, तसेच आरोग्य प्रशिक्षणासाठी ठरवून दिलेल्या आकारातील छायाचित्र सोबत आणण्याचे आवाहन जिल्हा हज प्रशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे लसीकरण इन्चार्ज जावेद अली फारूखी यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम